विवाहितेचा विनयभंग, जाब विचारला असता…
Ahmednagar Woman Molested: विवाहितेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य.
अहमदनगर: पाणीपुरी खात असलेल्या विवाहितेचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करून पतीने जाब विचारला असता त्यांनादेखील मारहाण केल्याची घटना कोठला परिसरात घडली आहे. याप्रकरणी उपनगरात राहणाऱ्या पिडीत विवाहितेने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने चंद नवाब शेख (रा. कोठला) व एक अनोळखी विरूध्द विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नगर शहरातील एका उपनगरात राहणार्या फिर्यादी व त्यांचे पती 9 ऑगस्ट रोजी रात्री मोहरम उत्सव बघून कोठला येथे पाणीपुरी खाण्यासाठी थांबले होते. तेथे चंद व एक अनोळखी इसम आला. चंद याने फिर्यादीचा हात पकडून लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. फिर्यादी यांच्या पतीने चंदला जाब विचारला असता चंद व त्याच्या सोबतच्या अनोळखीने फिर्यादीच्या पतीला शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली.
फिर्यादीच्या पतीचा खिसा फाटून खिशातील खाली पडलेले 17 हजार रुपये चंद शेख घेऊन पळून गेला व खिशातील मोबाईल खाली पडून गहाळ झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पुढील तपास तोफखाना पोलीस करीत आहेत.
Web Title: molestation of a married woman, Jab would have been asked