Home संगमनेर Accident:  संगमनेर, बस व दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार

Accident:  संगमनेर, बस व दुचाकीच्या भीषण अपघातात एक जण ठार

Sangamner Accident News:  मांची फाटा येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात, दुचाकीस्वार ठार.

person was killed in a terrible accident involving a bus and a two-wheeler

संगमनेर:  संगमनेर तालुक्यातील कोल्हार-संगमनेर राज्य महामार्गावरील मांची फाटा येथे बस व दुचाकीचा भीषण अपघात झाला. शुक्रवारी सकाळी झालेल्या अपघातात दुचाकीस्वार सचिन बाळू गायकवाड (वय – २७, रा. निफाड) हा गंभीर जखमी झाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, शुक्रवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास दुचाकीस्वार (एम एच १५ डीझेड ४७४३) सचिन बाळू गायकवाड हा संगमनेरच्या दिशेने चालला होता. याचंवेळी संगमनेरहून येत असलेल्या मध्यप्रदेश परिवहन मंडळाच्या बसने (एम.पी. १३ एबी ३३३३) मांची फाटा येथे दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे सचिन गायकवाड हा गंभीर जखमी झाला होता.

यावेळी रस्त्याने प्रवास करणाऱ्या नागरीकाच्या मदतीने स्थानिकानी सचिनला प्राथमिक आरोग्य केंद्र निमगावजाळी येथे उपचारासाठी दाखल केले होते. परंतू सचिनची नाजुक परिस्थिती पाहता डॉक्टरानी त्याला तात्काळ लोणी येथील  रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र लोणी येथिल रुग्णालयात उपचारापुर्वीचं सचिनचे दुर्दैवी निधन झाल्याची माहिती पोलीस पाटील दिलीप डेगंळे यानी दिली आहे.

दरम्यान सचिन हा निफाड तालुक्यातील रहिवासी असला तरी संगमनेर येथे एका खाजगी फायनान्स कंपनीत नोकरीला होता. त्याच्यां दुर्दैवी निधनाने पंचक्रोशीत शोककळा पसरली आहे.

Web Title: person was killed in a terrible accident involving a bus and a two-wheeler

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here