Home अहमदनगर अहमदनगर थरारक घटना: तलवारीने तरुणाच्या मानेवर केला वार

अहमदनगर थरारक घटना: तलवारीने तरुणाच्या मानेवर केला वार

Ahmednagar | Nevasa Crime News: मानेवर तलवारीने वार ( sword struck), आरोपी ताब्यात 

sword struck the youth on the neck

नेवासा: नेवासा तालुक्यातील करजगाव येथे तरुणाच्या मानेवर तलवारीने वार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत तरुण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. आरोपीला ताब्यात घेण्यात आले.

करजगाव येथील अनिल योसेफ गायकवाड या तरूणावर गावातील अर्जुन भास्कर गायकवाड याने दुपारी एकच्या सुमारास तलवारीने मानेवर वार केल्याची घटना घडली. यात अनिल गायकवाड गंभीर जखमी झाला असुन उपचारासाठी हलविले आहे.

ही घटना किरकोळ कारणावरून घटना घडल्याचे बोलले जात आहे. दरम्यान पोलिस कॉस्टेबल विशाल थोरात यांनी घटनास्थळी येत आरोपीला ताब्यात घेत सोनई पोलिस ठाण्यात नेले.

Web Title: sword struck the youth on the neck

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here