Home अहमदनगर खासगी सावकारांच्या जाचास कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, १५ सावकारांवर गुन्हा

खासगी सावकारांच्या जाचास कंटाळून व्यावसायिकाची आत्महत्या, १५ सावकारांवर गुन्हा

Shrigonda Suicide News:  ९ खाजगी सावकारांना अटक केली असून ६ सावकार फरार.

businessman commits suicide after being harassed by private moneylenders

श्रीगोंदा: श्रीगोंदा शहरातील व्यावसायिक शिवराम वहाडणे यांनी सावकारांच्या त्रासाला कंटाळून ९ ऑगस्ट रोजी सकाळी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्याच्या खिशात १५ खासगी सावकारांची नावे व रक्कम लिहिलेली होती.

याबाबत वहाडणे यांच्या पत्नी वंदना शिवराम वहाडणे यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. या फिर्यादीवरून श्रीगोंदा पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शुक्रवारी ९ खाजगी सावकारांना अटक केली असून ६ सावकार फरार झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, श्रीगोंदा शहरातील व्यावसायिक शिवराम रमेश वहाडणे (वय ४२) यांनी ९ ऑगस्ट रोजी सकाळी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यांनी त्रास दिलेल्या तब्बल १५ खाजगी सावकारांची नावे चिठ्ठीत लिहून व्याज व मुद्दल देऊनही वारंवार दुकान व घरी येऊन धमक्या व दमदाटी करत असल्याचे नमूद केले होते.

याबाबत पत्नी वंदना शिवराम वहाडणे ( वय ३३ ) यांनी श्रीगोंदा पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, प्रवीण जाधव ४० हजार रुपये १० टक्के व्याजाने, कांतीलाल कोकाटे २ लाख रुपये ५ टक्के व्याजाने, अक्षय कैके २० हजार रुपये २० टक्के व्याजाने, बापू चव्हाण ५० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, राहूल धोत्रे ५० हजार रुपये १० टक्के व्याजाने, आप्पा सांगळे २५ हजार ४० टक्के व्याजाने, जयसिंग मस्के अडीच लाख ४ टक्के व्याजाने, आबा झुंजरूक २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, धीरज भोसले १ लाख २० हजार रुपये २० टक्के व्याजाने, मुन्ना काळे १ लाख २० टक्के व्याजाने, आकाश भोसले १ लाख ३० हजार रुपये २० टक्के व्याजाने, राहूल खामकर ३० हजार रुपये ५ टक्के व्याजाने, विनोद घोडके २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने, शिंदे सरपंच २० हजार रुपये ४० टक्के व्याजाने व राजू बोरुडे ४० हजार रुपये ४० टक्के व्याजाने असे सर्वांचे मिळुन ११ लाख १५ हजार रुपये प्रति महिना ५ टक्के ते ४० टक्के व्याज दराने पैसे घेतले होते.

माझ्या पतीने या सावकारांची व्याजासह मुद्दल देऊनही हे सावकार दुकान, घरी येऊन वारंवार पैशाची मागणी करत दमदाटी व धमक्या देत होते. या सर्व जाचाला माझ्या पतीने आत्महत्या केली आहे. फिर्याद दाखल होताच पोलीसांनी सावकारांची धरपकड सुरू केली.

यातील नऊ जण जयसिंग मस्के, शहाजी झुंजरूक, कांतीलाल कोकाटे, बापू चव्हाण, अक्षय कैके, राहूल धोत्रे, भास्कर सांगळे, प्रविण जाधव व धीरज भोसले यांना अटक केली आहे व मात्र अजून ६ जण फरार झाले आहेत. या खळबळजनक प्रकरणामुळे शहर व तालुक्यातील खाजगी सावकारांचे धाबे दणाणले आहेत. अधिक तपास श्रीगोंदा पोलिस निरीक्षक रामराव ढिकले करत आहेत.

Web Title: businessman commits suicide after being harassed by private moneylenders

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here