Home क्राईम संगमनेर: प्रेमप्रकरणात वादातून महिलेला शिवीगाळ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

संगमनेर: प्रेमप्रकरणात वादातून महिलेला शिवीगाळ, फोटो व्हायरल करण्याची धमकी

Sangamner Crime Threats to make photos viral

संगमनेर | Crime News: दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झालेले असताना दोघांत वाद होऊन महिलेला तिच्या जातीवरून वारंवार बोलून शिव्या देणे, त्रास देणे तसेच तुझे फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करण्याची धमकी देणे या प्रकाराला कंटाळून सदर पिडीत महिलेच्या फिर्यादीवरून तालुक्यातील कोल्हेवाडी येथील सचिन ज्ञानदेव काळे याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील गणेशनगर येथील एका महिलेचे कोल्हेवाडी येथील सचिन काळे यांच्यासोबत प्रेमसंबंध होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यात  वाद सुरु होते. त्यातच १५ मार्च ते २७ मार्च दरम्यान आरोपी सचिन काळे याने सदर महिलेला तिच्या जातीवरून शिवीगाळ करीत मारहाणीची धमकी दिली. तसेच तुझ्यासोबत असलेले खासगी फोटो सोशियल मेडीयावर व्हायरल करील अशी धमकी देत असे. या सततच्या त्रासाला कंटाळून सदर महिलेने शहर पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध फिर्याद दिली असून त्यानुसार पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने हे करत आहे.  

Web Title:   Sangamner Crime Threats to make photos viral

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here