महिलेचा विनयभंग करून पतीसह मुलास मारहाण
अहमदनगर | Ahmednagar: महिलेचा विनयभंग करून तिच्या पतीसह मुलाला मारहाण केल्याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
शहरातील एका उपनगरात २६ मार्च रोजी ही घटना घडली. याप्रकरणी पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून राजू उर्फ राजेश सुखदेव पवार याच्याविरोधात मारहाण व विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पिडीत महिलेचे कुटुंबीय व आरोपी हे शेजारी राहतात. पवार याने २५ मार्च रोजी पिडीत महिलेचा विनयभंग केला. २६ मार्च रोजी पिडीत महिला व तिच्या पतीने विचारणा केली. यावेळी पतीसह मुलास मारहाण करण्यात आली. त्यामुळे या पिडीत महिलने तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Web TItle: Ahmednagar Beating husband by molesting a woman