Home संगमनेर संगमनेर: खांडगावचे ग्रामस्थ उतरले नदीपात्रात

संगमनेर: खांडगावचे ग्रामस्थ उतरले नदीपात्रात

Sangamner Khandgaon descended into the river basin

संगमनेर | Sangamner:  संगमनेर तालुक्यातील खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात वाळूचा उपसा केला आहे. नदी पात्रातून बेसुमार वाळू उपसा होत असल्याने विहिरीच्या पाण्याची पातळी खालावली आहे. पाणी चव बदलून दुषित होत आहे. नदीचे पाणी संपले की विहिरी कोरड्या होतात. या सर्व गोष्टीला कारणीभूत म्हणजे वाळू उपसा मोठ्या प्रमाणात होत आहे.

प्रशासनाच्या आशीर्वादाने स्थानिकांना दमदाटी करून वाळू तस्करी करतात. खांडगाव ग्रामस्थांनी महसूल विभागाकडे सातत्याने तक्रार करून देखील कारवाई होत नसल्याने संतप्त झालेले ग्रामस्थांनी नदीपात्रात आंदोलन केले आहे.

नदी पात्रात जाणारे रस्ते जेसीबीने उकरून संघर्ष केला आहे. खांडगाव परिसरात प्रवरा नदी पात्रात मोठमोठे खड्डे झाले आहे. नदीचे स्वरूप बदलले आहे. बेसुमार वाळू तस्करी मुळे अनेकांचे बळी गेले आहे. या वाळू उपसाचा अतिरेक झाल्याने ग्रामस्थ थेट नदीपात्रात उतरले आहे. नदीपात्रातच ठिय्या मांडला होता. वाळू तस्करांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी होत आहे.

Web Title: Sangamner Khandgaon descended into the river basin

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here