Home संगमनेर संगमनेर: रांगोळी काढताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले

संगमनेर: रांगोळी काढताना महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडले

Sangamner mangalsutra around the woman's neck was rubbed

संगमनेर | Sangamner: संगमनेर शहरातील नवीन नगर रोड येथे अभिनव नगरमध्ये एका सेवानिवृत्त मुख्याधीपिकेचे गळ्यातील सव्वा तोळ्याचे मंगळसूत्र ओरबाडून नेल्याचा प्रकार घडला आहे.

अरुंधती विजय रेघे हे अभिनवनगरमध्ये आपल्या कुटुंबांसमवेत राहतात. सेवानिवृत्त मुख्याधीपिका असलेल्या रेंघे या सकाळी सव्वा सात वाजेच्या सुमारास घरातील अंगणात रांगोळी काढत होत्या. त्यांची रांगोळी काढून झाल्यावर त्या घरात जात असताना दुचाकीवर दोन चोरटे येऊन मागे बसलेल्याने त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र ओरबाडत त्यांना जोराचा धक्का दिला. त्यांनतर हे चोरटे नवीन नगर रोडच्या दिशेने गेले. अचानक काही क्षणात हा प्रकार घडल्याने रेंघे गोंधळून गेल्या होत्या. त्यांच्या मानेला जखम झाली आहे. त्यांची मुलगी हिने फोन करून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांना हा प्रकार सांगितला. देशमुख यांनी अभिनवनगरमध्ये भेट दिली असून सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

Web Title: Sangamner mangalsutra around the woman’s neck was rubbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here