नगर जिल्ह्यात या तालुक्यात डॉक्टरची पत्नी व दोन मुलांसह आत्महत्या
कर्जत | Karjat: कर्जत तालुक्यातील राशीन येथील प्रसिद्ध डॉक्टर महेंद्र थोरात यांनी राहत्या घरात पत्नी व दोन मुलांना गळफास देवून स्वतः गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. शानिवारी पहाटे ही घटना घडली.
त्यांनी गळफास घेतलेल्या खोलीच्या दरवाजाला चिट्ठी चिटकवून ठेवली होती. राशीनसह परिसरात या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रथमदर्शनी आत्महत्या वाटत असली तरी पोलीस तपासात खरे कारण समोर येईल.
आत्महत्या अगोदर या चिट्ठीत डॉक्टरने लिहिले आहे की, माझा मोठा मुलगा वय १८ कृष्णा याला कानाने कमी ऐकू येत असल्याने आम्हाला समाजात अपराध्यासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित आहोत. कृष्णाचेही कशात मन लागत नाही. हे दुख आम्ही आई वडील सहन करू शकत नाही. म्हणूनच आम्ही आत्महत्या करीत आहोत. हे अयोग्य असले तरी नाइलाजस्तव हे कृत्य करीत आहोत. यात कोणालाही जबाबदार धरू नये. असा उल्लेख चिट्ठीत करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलीस कसून चौकशी करत आहे.
Web Title: Karjat Suicide with doctor’s wife and two children