Home अहमदनगर शिवजयंतीदिवशी तलवारीने हल्ला करणाऱ्या तरुणास अटक

शिवजयंतीदिवशी तलवारीने हल्ला करणाऱ्या तरुणास अटक

Kopargaon Youth arrested for attacking with a sword

कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव शहरात शिवजयंती दिवशी एका तरुणाने अंगात भगवा वेश घालून हातात तलवार घेऊन धिंगाणा केल्याची घटना सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास घडली.

भगवा चौक ते कन्या शाळा दरम्यान या तरुणाने धिंगाणा घातला. हातात पिवळी मुठ असलेली लोखंडी तलवार  असलेला हा माथेफिरू तरुण प्रत्येकाला मारण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी नागरिक जीव मुठीत ठेऊन धावत पळत सुटत होते. या हल्ल्यात एक जण जखमी झाला आहे.

आकाश नारायण कुळधरण वय २४ रा. कोपरगाव याच्याविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शहरभर शिवजयंतीचा कार्यक्रम साजरा झाला. सगळीकडे भगवे झेंडे व पताका यामुळे  शिवमय वातावरण झाले होते. सकाळी १० वाजता अचानक भगवा वेश, दाढी वाढलेला एक तरुण भगवा चौकातून प्रकट झाला. त्याच्या हातात तलवार होती. तो सुसाट निघाला त्याच्या मागे त्याची आई व बहिण होती. हा युवक तलवारीचा धाक दाखवत अंगावर धावून येऊन तलवारीने मारण्याचा प्रयत्न करीत होता. एक युवक स्कूटरवरून जात असताना त्याच्या अंगावर तलवार मारली. यात तो चालक जखमी झाला. यानानात्र दोघे तिघे मोटारसायकल वरून जात असताना त्यांच्यावर देखील तलवारीने वार करत होता. तो शिवाजी महाराज पुतळ्यासमोर हातात तलवार घेऊन आरडाओरडा करत होता. पोलिसांनी या युवकाला ताब्यात घेतले. शांतता भंग प्रकरणी त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.  

Web Title: Kopargaon Youth arrested for attacking with a sword

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here