Home संगमनेर कार चक्काचूर: बोटा येथे नाशिक पुणे महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली

कार चक्काचूर: बोटा येथे नाशिक पुणे महामार्गावर कार पुलावरून खाली कोसळली

car fell down from the bridge on Nashik-Pune highway at Bota

संगमनेर | Bota: संगमनेर तालुक्यातील नाशिक पुणे महामार्गावर बोटा येथील बाह्यवळण पुलावरून कार खाली कोसळलेची घटना घडली आहे. या घटनेत कारचा चक्काचूर झाला आहे. ही घटना शनिवारी दि. २० फेब्रवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत चार जण गंभीर जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी पुणे येथून संगमनेरच्या दिशेने कार (क्रमांक एम.एच. १२ एच. झेड. ७५८२) जात असताना बोटा येथील बाह्यवळण पुलाजवळ आली असता कार थेट कोसळली. यावेळी घटनेची माहिती समजताच नागरिकांनी घटनास्थळी जाऊन जखमींना बाहेर काढण्यात आले असून उपचारासाठी रुग्णालयात रुग्णवाहिकेद्वारे हलविण्यात आले आहे.  हा अपघात इतका भयंकर होता की यामध्ये कार अक्षरशः चक्काचूर झाली आहे. या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली होती. या घटनेची माहिती समजताच घारगाव पोलीस व महामार्ग पोलीस यांनी धाव घेतली.

Web Title: car fell down from the bridge on Nashik-Pune highway at Bota

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here