Home क्राईम संगमनेर: पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले

संगमनेर: पोलीस असल्याची बतावणी करत एकास लुटले

Sangamner News One was robbed pretending to be a policeman

संगमनेर | Sangamner News: संगमनेर तालुक्यातील दाढ खुर्द शिवारात लक्षमण कृष्णाजी खेमनर रा. चनेगाव या व्यक्तीला पोलीस असल्याची बतावणी करत एका भामट्याने सात हजार रुपयाला गंडा घातल्याची घटना घडली आहे. याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, दिनांक ७ जुलै रोजी बुधवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास लक्षमण कृष्णाजी खेमनरहे दाढ खुर्द येथील स्मशानभूमीलगत हून चालले असता यावेळी त्यांना एका अज्ञात व्यक्तीने पोलीस असल्याची बतावणी करत तपासणी करण्यासाठी त्याने खिशातील सर्व सामान बाहेर काढण्यास सांगितले. यावेळी त्याने मोठ्या हात चलाखीने पाकिटातील सात हजार रुपयांची रोख रक्कम काढून घेतली व खिशातील बाकी वस्तू रुमालात बांधून पिशवीत टाकल्या. व तेथून तो निघून गेला. यानंतर खेमनर यांनी आपल्या वस्तूची पाहणी केली असता आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने याबाबत आश्वी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली.

Web Title: Sangamner News One was robbed pretending to be a policeman

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here