Home अहमदनगर दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह विहिरीत आढळला

Rahuri girl who had been missing for two days was found in a well

राहुरी | Rahuri: राहुरी तालुक्यातील वांबोरी येथील दोन दिवसांपासून बेपत्ता झालेली १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह वांबोरी परिसरातील विहिरीत पाण्यावर तरंगताना आढळून आल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

बुधवारी आपल्या घरापासून बेपत्ता झालेली किरण गणेश पाठक वय १३ वर्ष ही बेपत्ता झाली होती. एवढ्या लहान मुलीचा मृतदेह आढळून आल्याने ही आत्महत्या की घातपात याबाबत परिसरात दबक्या आवाजात चर्चा सुरु आहे.

बेपत्ता मुलीचे वडील गणेश मनोज पथक यांनी परिसरात शोध घेतला असता ती कोठेही मिळून आली नाही म्हणून वांबोरी पोलीस दूर क्षेत्रामध्ये बेपत्ता झाल्याची तक्रार दिली होती.

गुरुवारी सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास वांबोरी विळद रस्त्याच्या कडेला भारत जाधव यांच्या मालकीच्या विहिरीतील पाण्यात तरंगताना मृतदेह आढळून आला.

मायात किरणचा मृतदेह विहिरीतून काढून उतरणीय तपासणीसाठी वांबोरी ग्रामीण रुग्नालयात पाठविण्यात आला. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.  

Web Title: Rahuri girl who had been missing for two days was found in a well

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here