Home संगमनेर संगमनेर: कुरण येथे विलगीकरण कक्षात ठेवल्याने ग्रामसेवकाला धक्काबुक्की

संगमनेर: कुरण येथे विलगीकरण कक्षात ठेवल्याने ग्रामसेवकाला धक्काबुक्की

संगमनेर: घाटकोपर येथून कुरण येथे आलेल्या नागरिकांना संस्थात्मक विलगीकरण कक्षात ठेवल्याने राग मनात ठेऊन ग्रामसेवकाला शुक्रवारी ३ जुलै रोजी शिवीगाळ ब धक्काबुकी करण्यात आली आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये दोन महिला व अल्पवयीन मुलांचा देखील समावेश आहे.

गंगाधर चंद्रभान राउत असे कुरण ग्रामसेवकाचे नाव आहे. त्यांना दुसऱ्यांदा शिवीगाळ व धक्काबुकी करण्यात आली आहे. शुक्रवारी सायंकाळी ४.३० वाजेच्या सुमारास हा प्रकार घडला.

जाकीर समशेर शेख, जहागीर शामीर शेख, जमशेद शामीर शेख, शाहीन जाकीर शेख, यास्मिन समशेर शेख, वासिम समशेर शेख, कय्युम महमद हुसेन शेख सर्व रा. घाटकोपर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

११ जून रोजी जाकीर समशेर शेख व त्याच्या कुटुंबातील व्यक्ती घाटकोपर येथून कुरण गावात आल्याची माहिती ग्रामसेवक राउत यांना मिळाल्यानंतर जाकीर शेख यांच्या घरी जाऊन कुटुंबातील व्यक्तींना जिल्हा परिषदेतील शाळेतील विलगीकरण कक्षात १० दिवस व घरी आल्यानंतर सात दिवस घरी राहण्याची समज दिली होती. जाकीर शेख यांना याचा राग येत त्यांनी मोबाईलवरून ग्रामसेवकांना शिवीगाळ करण्यात आली. ग्रामपंचायतीसमोर शिवीगाळ व धमकी देण्यात आली. यांनतर शहर पोलीस ठाण्यात २६ जूनला फिर्याद दाखल केली. त्यानंतर काल मनात राग धरून शिवीगाळ व धक्काबुकी करण्यात आली. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात ९ जणांविरुद्ध सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.  

Website Title: Sangamner News Pushing the gram sevak

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here