अहमदनगर जिल्ह्यात आज २६ करोनाबाधित रुग्ण आढळून आले
Coronavirus/अहमदनगर: अहमदनगर जिल्ह्यात आज २६ नवे रुग्ण आढळून आले आहेत. अहमदनगर जिल्हा सामान्य करोना टेस्ट लॅबमध्ये २६ जणांचे पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाले आहेत.
यात नगर शहरातील ०८, संगमनेर तालुक्यातील तब्बल १३, कोपरगाव तालुक्यातील ०२, अकोले तालुक्यातील ०२ आणि बीड जिल्ह्यातील एकाचा समावेश आहे.
वाचा: संगमनेरात १३ जण तर अकोले ब्राम्हणवाडा येथील दोन करोना बाधित
नगर शहरात ८ रुग्ण आढळून आले आहेत. कोपरगाव तालुक्यातील कारंजा चौक ०१, येसगाव ०१, धारणगाव दवंडे मामा वस्ती येथे ०१ करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत.
त्याचबरोबर बीड जिल्ह्यातील कारखेल ता. आष्टी येथे ०१ करोना रुग्ण आढळून आला आहे.
Web Title: Coronavirus Ahmednagar 26 corona positive update