Home संगमनेर नाशिक पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

नाशिक पुणे महामार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू

Sangamner News Unknown vehicle Dash Bibatya Death 

संगमनेर | Sangamner News: पुणे नाशिक महामार्गावर संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव परिसरात, रस्ता ओलांडणाऱ्या १० वर्षीय नर बिबट्याला आज पहाटे तीन वाजेच्या सुमारास अज्ञात वाहनाने जोराची धडक दिल्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

या परिसरात बिबट्यांचा वावर कायम असतो. साकुर ,जांबूत, कोठे, वणकुटे परिसरातील जंगल ही वाघांची लपवणुक आहे. रात्रीच्या वेळी हे बिबटे मुळा नदी परिसरात शिकारीसाठी येत असतात.

आज पहाटे असाच एका बिबट्याचा मृत्यू झाला आहे. सदर बिबट्या रस्ता ओलांडत असताना मोठ्या वाहनाने बिबट्याला धडक दिली असावी असा प्राथमिक अंदाज वनाधिकारी यांनी व्यक्त केला. काही जागरूक नागरिकांनी घारगाव पोलीस स्टेशनला याची कल्पना दिली, त्यांनी व वनाधिकारी, वन मजूर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पशु वैद्यकिय अधिकारी यांनी शवविच्छेदन करून, वन अधिकारी यांनी बिबट्याचे अंतिम संस्कार चंदनपुरी रोप वटिकेत करण्यात आले आहे.  वन अधिकारी योगिता पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी भेट देऊन पुढील कार्यवाही केली.

Web Title: Sangamner News Unknown vehicle Dash Bibatya Death 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here