Home संगमनेर संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील बंधाऱ्यात बुडून एकाचा मृत्यू

Sangamner One dies after drowning in Pimple dam

संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पिंपळे येथील जगन्नाथ दामू सानप वय ६५ रा. पिंपळे या व्यक्तीचा पुलावरून पाय घसरून बंधार्यात पडून मृत्यू झाल्याची घटना घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत मारुती आंधळे यांनी पोलीस स्टेशनमध्ये माहिती दिली आहे. यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

जगन्नाथ दामू सानप हे पिंपळे येथून आपल्या घरून दि. १३ रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारस गावात देवदर्शनावरून घरी परतत असताना गावानजीक असणाऱ्या पुलावरून पायी जात असताना पुलाला कठाडे नसल्याने त्यांचा तोल जाऊन बंधार्यातील पाण्यात बुडून त्यांचा मृत्यू झाला.

हा प्रकार दि. १४ रोजी सकाळी १० वाजता गावाशेजारील बंधार्यात पाण्यामध्ये काहीतरी तरंगत असल्याचे दिसून आले. त्यावर शहानिशा केली असता हा मृतदेह जन्नाथ सानप यांचा असल्याचे लक्षात आले. गावकऱ्यांच्या मदतीने हा मृतदेह घुलेवाडी येथे उत्तरणीय तपासणीसाठी पाठविण्यात आला. घुलेवाडी पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.  

Web Title: Sangamner One dies after drowning in Pimple dam

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here