अकोले तालुक्यातील सध्या २९ करोना रुग्णांवर उपचार सुरु
अकोले | Akole: आज मंगळवारीही तालुक्यात ०३ व्यक्ती कोरोना बाधीत आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकुण रुग्णसंख्या ३०६८ इतकी झाली आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या रॅपिड ५४ ॲन्टीजन टेस्टमध्ये ०२ व्यक्तीचा व खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात ०१ अशी एकुण ०३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे.
आज अकोले ग्रामीण रुग्णालय येथून ५४ व राजुर ग्रामीण रुग्णालय येथून २४ अशी एकुण ७८ व्यक्तीचे स्वॅब अहमदनगर प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहे.
आज तालुक्यात घेण्यात आलेल्या ५४ रॅपिड ॲन्टीजन टेस्टमध्ये अकोले शहरातील ३६ वर्षीय पुरूष, ३४ वर्षीय महीला तर खाजगी प्रयोगशाळेतील अहवालात राजुर येथील ४५ वर्षीय महीला,अशी एकुण ०३ व्यक्तीचा कोरोना अहवाल पॅाझिटीव्ह आला आहे. तालुक्यातील एकुण रुग्णसंख्या ३०६८ झाली आहे.
अकोले तालुक्यातील सध्या २९ रुग्ण उपचार घेत आहेत. तर तालुक्यातील एकूण मृत्यूची संख्या ३५ इतकी झाली आहे. तालुक्यातील बरे होण्याचे प्रमाण ९७.९१ टक्के इतके झाले आहे.
Web Title: Akole Taluka 29 Corona Patient taken Treatment