Home अकोले संगमनेर: न्यायालयाने जामीन फेटाळताच आरोपीने कोर्टातून धूम ठोकली

संगमनेर: न्यायालयाने जामीन फेटाळताच आरोपीने कोर्टातून धूम ठोकली

Sangamner ourt rejected his bail the accused fled the court

संगमनेर | Sangamner: अकोले येथील खंडणी प्रकरणातील मुख्य सूत्रधार गणेश भागुजी कानवडे याचा संगमनेर जिल्हा सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्याने त्याने अटकेच्या भीतीने कोर्टातून धूम ठोकली. नागरिक व पोलिसांनी पाठलाग करत त्याला पकडले. ही घटना मंगळवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली.

बांधकाम व्यावसायिक लक्ष्मीकांत अंबादास नाईकवाडी यांच्या कामात अडथळे आणून त्यांच्याकडे गणेश भागुजी कानवडे, सुभाष भागुजी कानवडे व मयूर सुभाष कानवडे यांनी १ कोटीची खंडणी मागितली होती. यासाठी नाईकवाडी यांनी ३० लाख देखील दिले होते. मात्र कानवडे यांची मागणी वाढल्याने नाईकवाडी यांच्या फिर्यादीवरून या तिघांवर खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला. फेब्रुवारीत या तिघांना १५दिवसांच्या जामिनावर सोडले होते. मात्र मुदत संपल्याने मंगळवारी तिघानंही जिल्हा व सत्र न्यायालयाने हजर राहण्याचे आदेश दिले. न्यायाधीश भोसले यांनी तिघांचा जामीन अर्ज फेटाळला. अटकेच्या भीतीने कानवडे याने न्यायालयातून पळ काढला. नागरिक व पोलिसांनी त्याचा दुचाकीवरून पाठालाग केला. त्याने दुसऱ्याच्या दुचाकीवर बसण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याला नागरिकांनी साळीवाड्यात पकडून पोलिसांच्या स्वाधीन केले.

Web Title: Sangamner ourt rejected his bail the accused fled the court

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here