Home अकोले अकोले तालुक्यात कोतूळ चारसह एकूण १३ जण करोनाबाधित

अकोले तालुक्यात कोतूळ चारसह एकूण १३ जण करोनाबाधित

Kotul four Positive and Akole taluka total 13

अकोले | Akole: अकोले तालुक्यात बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात १३ जण करोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये कोतूळ येथील चार महिला बाधित आढळून आल्या आहेत. तालुक्याची एकूण बाधितांची संख्या ३३२३ इतकी झाली आहे.

बुधवारी प्राप्त झालेल्या अहवालात कासार गल्ली अकोले येथे २४ वर्षीय महिला, देवठाण येथे २९  वर्षीय पुरुष, टाकळी येथे ३९ वर्षीय महिला, माळीझाप येथे ४९ वर्षीय पुरुष, गुजरी मार्केट अकोले येथे ३८ वर्षीय महिला, इंदोरी येथे ४८ वर्षीय पुरुष, अकोले येथे १६ व १८ वर्षीय मुलगा, लिंगदेव येथे ६५ वर्षीय पुरुष, कोतूळ येथे २२,२३,२४,२१  वर्षीय महिला असे १३ जण करोनाबाधित आढळून आले आहेत. तालुक्यात एकूण ३३२३ इतकी संख्या झाली असून एकूण मृत्यू ४३ इतके झाले आहे.

Web Title: Kotul four Positive and Akole taluka total 13

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here