Home अहमदनगर प्रेमविवाहानंतर सहा महिन्यातच पत्नीचा खून

प्रेमविवाहानंतर सहा महिन्यातच पत्नीचा खून

Karjat Murder of wife just six months after love marriage

कर्जत | Karjat:  कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथे प्रेमविवाह केलेल्या पत्नीचा खून केल्याची घटना उघडकीस आली आहे.

लग्न होऊन सहा महिने झाल्यानंतर आत्महत्या केल्याचा बनाव करत खून केला. पोलिसांच्या सतर्कतेमुळे खून झाल्याचे उघडकीस आले आहे अशी माहिती पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी दिली.

शंकर किशोर साळवे वय २० रा. मिरजगाव ता. कर्जत या तरुणाने सहा महिन्यापूर्वी करमाळा तालुक्यातील नेहा हिच्या सोबत प्रेम विवाह केला. मात्र लग्नानंतर दोघांत वाद होत होते. दि, ८ रोजी दोघांमध्ये भांडण झाले. त्यावरून शंकर याने नेहाला मारहाण केली. या मारहाणीत तिच्या डोक्याला मार लागून तिचा मृत्यू झाला. त्यानंतर शंकर याने नेहाची बहिण दिक्षा हिस फोन करून नेहा हिने आत्महत्या केल्याचे असे कळविले.

शंकर याने नेहा दवाखान्यात नेले. तिथे त्याने डॉक्टरांना आत्महत्या केल्याचे सांगितले. त्यावेळी डॉक्टरनी पोलिसांना कळविले. पोलीस उपनिरीक्षक अमरजित मोरे हे रुग्णालयात आले. त्यांना संशय आला. त्यांनी डॉक्टरांना मृतदेह श्वाविचेदन करण्यास पाठविले. त्यामध्ये नेहा हिच्या डोक्याला मार लागल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी शंकर साळवे यास अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  

Web Title: Karjat Murder of wife just six months after love marriage

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here