वीरगाव येथे विषारी औषध प्राशन करून महिलेची आत्महत्या
अकोले | Akole: अकोले तालुक्यातील वीरगाव येथील एका २६ वर्षीय विवाहित महिलेने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.
योगिता विजय कदम वय २६ असे या विवाहित आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. याबाबत महिलेचा पती विजय सुधाकर कदम यांनी अकोले पोलीस स्टेशनला खबर दिली असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
या खबरीवरून, पत्नी योगिता विजय कदम वय २६ हिने १० मार्च रोजी सकाळी साडे नऊ वाजण्यापूर्वी काहीतरी विषारी औषध सेवन केल्याने तिचा मृत्यू झाला. यावेळी तातडीने अकोले ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र तोपर्यंत तिचा मृत्यू झाला होता. ग्रामीण रुग्णालयातील डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले.
Web Title: Virgaon married woman Suicide