संगमनेरात दोन मंगल कार्यालयांना २० हजारांचा दंड
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहर पोलिसांनी करोना महामारीमुळे मंगल कार्यालयांवर चांगलीच नजर ठेवली आहे.
५० पेक्षा अधिक लोक जमाविल्यामुळे राजापूर येथील विठाई मंगल कार्यालय व घुलेवाडी येथील पाहुणचार मंगल कार्यालय यांना प्रत्येकी १० हजार रुपये दंड ठोठाविण्यात आला आहे.
संगमनेर शहर पोलीस निरीक्षक मुकुंद देशमख यांनी ही कारवाई केली आहे. शहरातील मंगल कार्यालयामध्ये धुमधडाक्यात लग्न होत असल्याने पोलिसांनी ही कारवाई केली आहे. तसेच मंगल कार्यालयाच्या बाहेर डीजेचा धिंगाणा होत असल्याने दोन डीजे मालकानाही प्रत्येकी पाच हजार रुपयांचा दंड आकारण्यात आला आहे.
करोना महामारीच्या पार्श्वभूमीवर घालून दिलेल्या नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा इशारा पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी दिला आहे.
शहरामधील सात मंगल कार्यालयामध्ये लग्न समारंभ आयोजित करण्यात आला हिता. त्या ठिकाणी पोलिसांनी भेट दिल्या. मात्र तिथे कोणतीही गर्दी न आढळल्याने कारवाई करण्यात आली नाही.
Web Title: fine to two Marriage offices in Sangamner