Home संगमनेर चहामध्ये गुंगीचे औषध  देऊन संगमनेर पंचयात  स.च्या माजी सदस्याचा महिलेवर अत्याचार

चहामध्ये गुंगीचे औषध  देऊन संगमनेर पंचयात  स.च्या माजी सदस्याचा महिलेवर अत्याचार

Sangamner assaulted a woman: संगमनेर तालुक्यातील हनीट्रॅप (Honeytrap) प्रकरण: महिलेची पंचायत समितीच्या माजी सदस्यावर अत्याचार केल्याची फिर्याद.  सुमारे ४० लाखाला लुटल्याची फिर्याद संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी उर्फ विष्णुर्धत अनाजी रहाटळ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दिली होती. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. 

Sangamner Panchayat assaulted a woman by giving gungy medicine in tea

संगमनेर : प्राथमिक आरोग्य केंद्रात कर्मचारी म्हणून सेवेत असलेल्या महिलेशी झालेल्या ओळखीतून संगमनेर पंचायत समितीच्या माजी सदस्याने या महिलेस त्रास देत चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून तिच्यावर अत्याचार केला. तसेच आरोग्य खात्यात प्रमोशन करून देतो. असे सांगत तिच्याकडून पैसे देखील घेतले. अनेकदा अत्याचार केला. या प्रकरणी पीडित महिलेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर पंचायत समितीच्या माजी सदस्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. करण्यात

शिवाजी उर्फ विष्णुपंत अनाजी रहाटळ (रा. जवळे कडलग, ता. संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या पंचायत समितीच्या माजी सदस्याचे नाव आहे. परिचर म्हणून काम करत असताना २०१५ मध्ये रहाटळ यांच्यासोबत ओळख झाली. रात्रीच्या वेळी मोबाईलवर संपर्क करून ते मला त्रास द्यायचे. त्यांनी चहामध्ये गुंगीचे औषध मिसळून अत्याचार केले. याबाबत कुणाला काही सांगितल्यास तुझी नोकरी जाईल व तुझे गावात राहणे अवघड करून टाकले. अशी धमकीही त्यांनी दिली होती.

राहाता तालुक्यात बदली करून घेतली. त्यानंतरही धाक दाखवून आला रहाटळ यांनी केलेल्या अत्याचारामुळे गर्भवती राहिले. दोन वेळा जबरदस्तीने गोळ्या देऊन गर्भपात केला.  तसेच काही रुपये रहाटळ यांना दिले आहेत. २०१५ ते २०२२ दरम्यान हा प्रकार घडल्याचे पीडित महिलेने | दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या  मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुजीत ठाकरे हे अधिक तपास करीत आहेत.

४० लाखाला लुटल्याची फिर्याद आरोग्य विभागातील एक महिला परिचर व तिचा नातेवाईक यांनी मोबाईलवरील चित्रीकरणाच्या आधारे सुमारे ४० लाखाला लुटल्याची फिर्याद संगमनेर पंचायत समितीचे माजी सदस्य शिवाजी उर्फ विष्णुर्धत अनाजी रहाटळ यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात काही दिवसांपूर्वी दिली होती. त्याच महिलेने रहाटळ यांच्याविरुद्ध गुरुवारी संगमनेर तालुक्यात पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या सर्व प्रकरणांचा तपास पोलीस करत आहेत.

Web Title: Sangamner Panchayat assaulted a woman by giving gungy medicine in tea

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here