अहमदनगर: वेश्या व्यवसायावर छापा; दोन महिलांसह दोन जणांना अटक
Ahmednagar: Raids on the prostitution business Two people, including two women, were arrested- उच्चभ्रू वस्तीत असलेल्या बंगल्यावर सकाळी छापा, दोन महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि चार पुरुष, असे सात जण आढळून आले.
अहमदनगर : सावेडी उपनगरातील सूर्यानगर येथील कुंटणखान्यावर छापा टाकत दोन महिलांसह चार जणांना अटक करण्यात आली आहे. तसेच एका अल्पवयीन मुलीची पोलिसांनी सुटका केली असून, गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे, अशी माहिती उपअधीक्षक अनिल कातकडे यांनी दिली.
मच्छींद्र पवार, गणेश वडे, सचिन शेडगे, अक्षय काला (पूर्ण नाव माहीत नाही) यासह दोन महिलांना अटक करण्यात आली आहे. पुणे येथील फ्रीडमफर्म संस्थेने सावेडी उपनगरातील सूर्यानगर येथे वेश्याव्यवसाय सुरू असल्याची तक्रार जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली होती. त्यानुसार पुणे येथील फ्रीडम फर्मचे प्रतिनिधी, अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाचे पथक आणि तोफखाना पोलीस यांच्या संयुक्त पथकाने गुरुवारी (दि. १०) दुपारी तीन वाजेच्या सुमारास सूर्यानगर येथील ओमसाई बंगल्यावर छापा टाकला असता तिथे दोन महिला, एक अल्पवयीन मुलगी आणि चार पुरुष, असे सात जण आढळून आले. अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन तिची सुटका करण्यात आली. कुंटणखाना चालवीत असलेल्या दोन महिला व चार पुरुषांना पोलिसांनी अटक केली असून, त्यांना तोफखाना पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. आहे. तोफखाना पोलीस रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
सावेडीतील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या बंगल्यावर सकाळी छापा टाकण्यात आल्याचे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाच्या एका अधिकाऱ्यांनी सांगितले. कारवाई करण्याचे काम सकाळपासून सुरू होते, तर आरोपींना अटक करण्यात एवढा उशीर का झाला, आरोपींना सायंकाळी पोलीस ठाण्यात आणण्यात आले. पोलिसांत गुन्हा दाखल करण्याबाबत एकवाक्यता नसल्याने गोंधळाची स्थिती होती.
Web Title: Raids on the prostitution business Two people, including two women, were arrested