Sangamner: संगमनेर तालुक्यात कोरोनाचा कहर, पुन्हा 37 जणांना बाधा
संगमनेर | Sangamner: संगमनेर शहर व तालुक्यात कोरोनाचा कहर अजूनही कायम असून दिवसेंदिवस त्यामध्ये भर पडतच आहे. या वाढणाऱ्या संख्येमध्ये बुधवारी पुन्हा 37 जणांचा समावेश झाला आहे. आज उशिरा आलेल्या अहवालामध्ये 37 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
प्राप्त झालेल्या अहवालात संगमनेर शहरातील 48 वर्षीय पुरुष, बाजारपेठ येथील 68 वर्षीय महिला, मालदाड रोड येथील 37 वर्षीय महिला व 28 वर्षीय तरुण, जानकी नगर येथील 37 वर्षीय इसम, कामगार वसाहत येथील 36 वर्षीय इसम असा सहा जणांचा तर तालुक्यातील खराडी येथील 23 व 46 वर्षीय महिला, पिंपळगाव कोंझिरा येथील 38 वर्षीय महिला व 65 वर्षीय पुरुष, निमोण येथील 65 वर्षीय महिला व 61 वर्षीय पुरुष, जोर्वे येथील 54, 30 वर्षीय महिला व 26 वर्षीय तरुण, समनापूर येथील 04 वर्षीय बालक व 32, 35, 60 वर्षीय महिला, घुलेवाडी येथील 10 वर्षीय मुलगा, 40 वर्षीय पुरूष व 61 वर्षीय महिला, कुरकूटवाडी येथील 17, 68, 47 वर्षीय पुरुष, सारोळे पठार येथील 30 वर्षीय इसम, निमगाव जाळी येथील 50 वर्षीय पुरुष, कौठे धांदरफळ येथील 36 वर्षीय इसम, रायतेवाडी येथील 40 वर्षीय पुरुष, चिखली येथील 51 वर्षीय पुरुष, रहिमपूर येथील 66 वर्षीय पुरुष, अंभोरे येथिल 36 वर्षीय पुरुष, वाघापूर येथील 74 वर्षीय वृद्ध, सावरगाव तळ येथील 12, 18 वर्षीय तरुण, नांदूर खंदरमाळ येथील 50 वर्षीय पुरुष, चिंचोली गुरव येथील 34 वर्षीय इसम असा एकतीस जनांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
Web Title: Sangamner Taluka 37 corona positive