Home अकोले विना अनुदानित विभागातील कर्मचार्‍यांना आर्थिक मदत द्यावी: यशवंत आभाळे

विना अनुदानित विभागातील कर्मचार्‍यांना आर्थिक मदत द्यावी: यशवंत आभाळे

Provide financial assistance to non-grant Teacher

अकोले प्रतिनिधी-  कोव्हिड – 19 च्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या संस्थेच्या विना अनुदानित विभागातील कर्मचार्‍यांना आर्थिक मदत देण्याची विनंती अकोले तालुका एज्युकेशन संस्थेच्या वतीने राज्य शासनाला करण्यात आली आहे.

मार्च 2020 पासून आपल्या राज्यामध्ये कोव्हिड – 19 या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. सदर वाढत्या प्रादुर्भावामुळे राज्यात वेळोवेळी लॉकडाऊन जाहीर केलेला आहे. संस्थेच्या विनाअनुदानित माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरीष्ठ महाविद्यालय व तंत्रशिक्षण महाविद्यालयामध्ये आजमितीस 300 कर्मचारी कार्यरत आहेत. लॉकडाऊनमुळे संस्थेची व विना अनुदानित विभागातील या सर्वच कर्मचार्‍यांची फार मोठ्या प्रमाणात आर्थिक कोंडी झालेली आहे. एप्रिल 2020 पासून संस्थेला फी व अन्य मार्गाने कोणत्याही प्रकारचे उत्पन्न नसल्याने या सर्वच कर्मचार्‍यांचे एप्रिल 2020 पासूनचे विनाअनुदानित विभागातील मानधन देणे शक्य झालेले नाही. त्यामुळे या सर्वच कर्मचार्‍यांना दैनंदिन उदरनिर्वाहाचे इतर साधन नसल्याने त्यांची मोठ्या प्रमाणात अवहेलना झालेली आहे. तसेच या विना अनुदानित विभागात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती सुध्दा नियमीतपणे शासनाकडून मिळत नसल्याने मोठ्या प्रमाणात आर्थिक समस्या निर्माण झालेली आहे. लॉकडाऊनच्या काळात शासनाने विविध विभागांकरीता आर्थिक मदतीचे पॅकेज दिलेले आहे. त्यानुसार संस्थेच्या विना अनुदानित विभागातील कार्यरत 300 कर्मचार्‍यांसाठी उदरनिर्वाहाकरीता व तातडीच्या वैद्यकीय मदतीकरता आवश्यकता म्हणून आर्थिक मदत मंजूर करावी असे संस्थेचे सेक्रेटरी यशवंत आभाळे यांनी याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

मुख्यमंत्री ना. उध्दव ठाकरे यांचेसह उपमुख्यमंत्री ना. अजित पवार, उच्च  तंत्रशिक्षण मंत्री ना. उदय सामंत, शालेय शिक्षण मंत्री ना. वर्षाताई गायकवाड,कौशल्य विकास मंत्री ना.नवाब मलिक, पालकमंत्री तथा ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ, यांना देण्यात आले आहे.

Web Title: Provide financial assistance to non-grant Teacher

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here