Akole: अकोले तालुक्यात आणखी २१ करोनाबाधित
अकोले | Akole: अकोले तालुक्यात करोनाचे संक्रमण सातत्याने सुरूच आहे. बुधवारी रात्री उशिरा तीन खासगी अहवाल प्राप्त झाले आहेत. आज गुरुवारी आणखी १८ करोनाबाधित आढळून आले आहेत. त्यामुळे अकोले तालुक्याची करोना बाधितांची संख्या ५९६ इतकी झाली आहे.
बुधवारी खासगी अहवालात कोतूळ बुद्रुक येथील ५९ वर्षीय पुरुष, ब्राम्हणवाडा येथील ७० वर्षीय पुरुष, पळसुंदे येथील ४६ वर्षीय महिला असे तीन करोनाबाधित आढळून आले आहेत.
आज अॅटीजेन चाचणीत १८ करोना बाधित आढळून आले यामध्ये माळीझाप येथील २६ वर्षीय तरुणी, कळस येथील ४० वर्षीय महिला, धुमाळवाडी येथे ५६, ३० वर्षीय पुरुष तर ५३,२५,१२ वर्षीय महिला करोनाबाधित आढळून आले आहेत. कुंभेफळ येथे ५६,४० वर्षीय पुरुष, ४२,४५ वर्षीय महिला, शहरातील कारखाना रोड येथे ३४ व १४ वर्षीय महिला, विठे येथे ५२,६०,४५ वर्षीय पुरुष, वारांघुशी येथे ३० वर्षीय पुरुष, धामणगाव पाट येथे ३९ वर्षीय पुरुष करोनाबाधित आढळून आले आहेत.
Web Title: Akole taluka 21 new corona infected