Home संगमनेर संगमनेर तालुक्यात एका शेतकऱ्यावर विळ्याने वार, शेतकरी गंभीर जखमी

संगमनेर तालुक्यात एका शेतकऱ्यावर विळ्याने वार, शेतकरी गंभीर जखमी

Sangamner taluka a farmer was stabbed

संगमनेर | Sangamner: आमच्या हद्दीत खुना दाखविणारे सिमेंटचे पोल मांडले असे असता एकास लाथाबुक्क्यांनी व विळ्याने वार करून जखमी केल्याची घटना संगमनेर तालुक्यातील निमगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी संगमनेर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

निमगाव खुर्द येथील गोरख यशवंत कासार या शेतकऱ्याने आमच्या बांधावर हद्द दाखविणारे सिमेंटचे पोल का मांडले असे विचारले असता तुमचे पोल हे आमच्या हद्दीत आले आहे असे म्हणून अनिल त्रिंबक कानवडे याने गोरक्ष कासार यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली त्यांनतर राजेंद्र त्रिंबक कानवडे याने त्यांच्या हातात असलेल्या विळ्याने कासार यांच्या मानेवर व डाव्या हाताच्या मनगटावर वार करून गंभीर जखमी केले. याप्रकरणी गोरख यशवंत कासार यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. यानुसार दोघाविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक एम. आर. सहाने हे अधिक तपास करीत आहे.

Web Title: Sangamner taluka a farmer was stabbed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here