चोरट्यांनी फोडले सराफाचे दुकान सोन्या चांदीचे दागिने लंपास
राहुरी: राहुरी शहरातील बाजारपेठेत शिवाजी चौकात सराफ बाजारात काल पहाटे तीन वाजेच्या सुमारास चोरट्यांनी दुकान फोडल्याची घटना घडली आहे. तब्बल चार ते पाच किलो चांदी व सोन्याचे दागिने असा लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास करण्यात आला आहे.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असून पथकाने तपास सुरु केला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सराफ व्यापारी दीपक गोटीराम नागरे यांचे सराफ बाजारामध्ये संतोष ज्वेलर्स हे दुकान आहे.
मध्यरात्री तीन वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुकानाचे सहा कुलुपे तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील शोकेशच्या कप्प्यातील चांदीचे पैंजण व अन्य वस्तू असा चार ते पाच किलो माल चोरट्यांनी लंपास केल्याची प्राथमिक माहिती आहे. सकाळी दुकानाच्या लाकडी फळ्या उघडलेल्या दिसल्या. परिसरातील लोकांनी नागरे यांना कळविले. ते दुकानात आले असता चोरी झाल्याचे दिसून आले. दुकानातील वस्तू व कप्पे विखुरलेले अवस्थेत दिसून आले.
सराफ व्यापारी नागरे कुटुंबियांच्या घरी कार्यक्रम असल्याने दुकान दोन दिवस बंद होते. यामुळे दुकानात पाळत ठेऊन चोरट्यांनी डल्ला मारल्याचे समजते. दुकानात व दुकानाबाहेर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आलेले आहे. पोलिसांनी पंचनामा करून ठसे पाचारण करण्यात आले होते.
Web Title: Rahuri Thieves broke into a goldsmith’s shop