Home क्राईम संगमनेर तालुक्यात बैलगाडा शर्यत, ४७ जणांवर गुन्हा दाखल

संगमनेर तालुक्यात बैलगाडा शर्यत, ४७ जणांवर गुन्हा दाखल

Sangamner Taluka Bullock cart race crime filed

संगमनेर | Sangamner: राज्यात बैलगाडा शर्यतीला बंदी आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंधही लागू आहेत तरी देखील संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे बेकायदेशीर रित्या बैलगाडा शर्यत आयोजित करण्यात आली. स्वातंत्र्यादिनी सकाळीच शर्यत पार पडली. पोलीस व प्रशासन कार्यक्रमात व्यस्त असताना ग्रामस्थांनी शर्यत भरविली. मात्र ही शर्यत चांगलीच भोवली आहे. घारगाव पोलीस ठाण्यात एकूण ४७ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून ६ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

संगमनेर तालुक्यातील दरेवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या या शर्यतीत संगमनेर, पारनेर आणि शेजारील पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील बैलगाड्या यात सहभागी झाल्या होत्या. सर्व नियम धुडकावून तब्बल ५० बैलगाड्या या शर्यतीत सहभागी झाल्या होत्या. ही शर्यत पाहण्यासाठी ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. पोलिसांनी एक बोलेरो गाडी व व एक बैलगाडी ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलीस आरोपींचा कसून चौकशी करत आहे.

Web Title: Sangamner Taluka Bullock cart race crime filed

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here