संगमनेर तालुक्यात शेतात अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने खळबळ
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील निमगाव जाळी शिवारातील शेतामध्ये रविवारी सकाळी अनोळखी व्यक्तीचा मृतदेह (Dead Body) आढळल्याने खळबळ उडाली आहे. सदर व्यक्तीस कोणी ओळखत असेल तर आश्वी पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुभाष भोये यांनी केले आहे.
रविवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास लोणी संगमनेर महामार्गावरील निमगाव जाळी शिवारातील श्रीरंग संभाजी वदक यांच्या हरभरा पिकातील शेतात ४० ते ४५ वय असलेल्या एका अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. याबाबतची माहिती कामगार पोलीस पाटील दिलीप डोंगळे यांनी पोलीस स्टेशनला दिली. माहिती मिळताच आश्वी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुभाष भोये व त्यांचे सहकारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने मृतदेह पुढील कारवाईसाठी संगमनेर येथील रुग्णालयात नेण्यात आला आहे. हा मृतदेह नेमकी कोणाचा आहे हे अद्याप समजू शकले नाही.
Web Title: Sangamner Taluka finding the body of a stranger in a field