Home संगमनेर संगमनेर: गाड्या जाळण्याची विकृती आता संगमनेरात

संगमनेर: गाड्या जाळण्याची विकृती आता संगमनेरात

संगमनेर: गाड्या जाळण्याची विकृती आता संगमनेरात

संगमनेर: नाशिक पुणे सारख्या शहरांमध्ये रात्रीच्या सुमारास गाड्या जाळण्याचे प्रकार नेहमीच  असतात. आता हे विकृतीचे लोन संगमनेर शहरातही पसरले असून शहरालगत असणाऱ्या साईश्रद्धा चौकात अज्ञातांनी दोन गाड्या जाळून टाकल्या. ही घटना सोमवारी रात्री 12 ते १:३० च्या सुमारास घडली. या प्रकारामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत माहिती अशी की, शहराजवळ असणाऱ्या साईश्रद्धा चौक घुलेवाडी येथे प्रभाकर अप्पाजी शिंदे यांचा बंगला आहे. सोमवारी रात्री शिंदे यांनी नेहमीप्रमाणे आपल्या होंडा अकटीवा आणि होंडा नुयो या दोन्ही दुचाकी गाड्या बंगल्यासमोरील व्हरांड्यात लावल्या होत्या. दरम्यान रात्री 12 च्या सुमारास अज्ञात इसमांनी पेट्रोल टाकून या गाड्यांना आग लावली. या आगीत या दोन्ही गाड्या जळून खाक झाल्या. दरम्यान हि आग भडाकल्याने घराचा दरवाजाही होरपळून निघाला. आजूबाजूच्या नागरिकांनी हि आग विझाविल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या सणासुधीचे दिवस असल्याने या दिवसांमध्ये शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. चोरी, लुटमार, घरफोडी याबरोबरच आता नागरिकांच्या गाड्या जाळण्याचे प्रमाण विकृती वाढली आहे. गाड्या जाळण्याचे हे कृत्य    कोणी दहशत पसरविण्यासाठी केले की शिंदे परिवाराशी असलेल्या वादातून झाले आहे, याचा तपास आता शहर पोलीस करत आहे, मात्र संगमनेर सारख्या शहरात असे प्रकार होऊ लागल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. शहरात झालेल्या अनेक गुन्हेगारी प्रकरणाचा तपास होत असल्याने आता या जळीत कांडाचा तपास होणार का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. जळीत कांडातील या समाज कंटाकावर कठोर कारवाई करावी व नागरिकांना भयमुक्त करावे अशी मागणी शहरातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे.  

Website Title: sangamner taluka news collision of the carts is now in the confluence


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here