Home संगमनेर संगमनेर: मारहाण करून चोरट्यांनी लांबविला ३४ हजारांचा ऐवज

संगमनेर: मारहाण करून चोरट्यांनी लांबविला ३४ हजारांचा ऐवज

संगमनेर: मारहाण करून चोरट्यांनी लांबविला ३४ हजारांचा ऐवज

संगमनेर: तालुक्यातील खांडगाव शिवारातील बालोडे मला येथे अज्ञात चोरट्यांनी रमेश भाऊसाहेब कोठवळ यांच्या घरात घुसून त्यांना लाकडी दांडक्याने मारहाण करत व इतर लोकांना चाकूचा धाक दाखवत रोख रक्कम व सोने चांदीचे दागिने चोरून पोबारा केला. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास घडली आहे. ऐन दिवाळीतच घटना घडल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

You May Also Like: Bollywood Actresses Priyanka Chopra, Mallika successful adult Movie

याबाबत शहर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, रमेश कोठवळ हे बालोडे मळा याठिकाणी आपल्या कुटुंबासोबत राहत आहे. सोमवारी रात्री घरातील सर्वजन नेहमीप्रमाणे जेवण करून झोपले होते. मंगळवारी पहाटे अडीच वाजेच्या सुमारास कोठवळ हे झोपेतून लघुशंकेसाठी उठले असता त्याच दरम्यान त्यांच्या पाठीमागून अज्ञात चोरट्याने लाकडी दांडक्याने जोराचा फटका मारला व दुसऱ्या चोरट्याने त्यांची पत्नी यांना चाकूचा धाक दाखवत त्यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने व हातातील मोबाईल हातातून हिसकावून घेतला. त्यानंतर घरातील सामानाचीही उचकापाचक केली व कपाटातील रोख रक्कम दहा हजार रुपये काढून घेतल्यानंतर या चोरट्यांनी पोबारा केला आहे. एकूण ३४ हजार रुपयांचा लांबविला. चोरी करण्याआगोदर चोरट्यांनी परिसरातीलच सतु भाऊ सखाराम जाधव यांच्याही घराला बाहेरून कडी लावली होती. चोरी झाल्याची माहिती श्री. कोठवळ यांनी आजूबाजूच्या नागरिकांना सांगितली. त्यामुळे नागरिकांनी कोठवळ यांच्या घराकडे धाव घेतली. काहींनी घटनेची माहिती शहर पोलिसांना दिली.

माहिती समजताच पोलीस निरीक्षक अभय पारमार, उपनिरीक्षक बाबुराव बोडखे, अमित महाजन घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांनी कोठवळ यांच्या घरात बघितले असता तर चोरट्यांनी सामानांची उचकापाचक केलीली होती. त्यानंतर परिसरात चोरट्यांचा शोध घेतला. पण तोपर्यंत चोरटे पसार झाले होते. मंगळवारी सकाळी अकरा ते बारा वाजेच्या सुमारास ठसे तज्ञ व श्वान पथकालाही पाचारण करण्यात आले. यावेळी घरापासून काही अंतरावर चोरट्यांनी कोठवळ यांचा मोबाईल टाकून दिला होता. त्यामुळे तो मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी रमेश कोठवळ यांच्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.  

Website Title: sangamner taluka news Thieves by hijacking the thieves


आमच्या मराठी बातम्या लाइव व्हाॅॅटस अॅप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा. मराठी बातम्या लाइव–येथे क्लिक करा.  किवा आमचा नंबर 9850540436 सेव्ह करा आणि Add Me नावासह मेसेज करा. रहा अपडेट दररोज. बातमी आवडल्यास जरूर शेअर करा. धन्यवाद.


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज , संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436


मराठी बातम्या लाइव: आपल्या परिसरातील घटना, बातमी, समस्या आपल्या भाषेत सांगावी असे आपल्यालाही वाटत असेल, ती संधी आम्ही तुम्हाला देतो. सोबत तुम्ही त्यासंबंधीचा फोटोही आम्हाला पाठवा. आपली बातमी मोफत प्रसिद्ध केली जाईल. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here