Home क्राईम संगमनेर: प्रवासी महिलेला दारू पाजून तिच्यावर अत्याचार

संगमनेर: प्रवासी महिलेला दारू पाजून तिच्यावर अत्याचार

Sangamner traveling woman was tortured by drinking alcohol  

संगमनेर: पिकअप प्रवासी चालकाने प्रवासी महिलेला मारहाण करून दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्याची घटना ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी पावणे सहा वाजेच्या सुमारास घडली. घारगाव पोलीस ठाण्यात अत्याचाराचा गुन्हा दाखल असलेल्या एका आरोपीला पोलिसांनी रविवारी जेरबंद केले आहे.

सुखदेव बबन कंकराळे रा. बारागाव पिंपरी रोड सिन्नर असे या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला १९ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

घारगाव पोलीस ठाण्याच्या पथकाने व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने १२ तासांत आरोपीस जेरबंद केले आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरून शुक्रवारी १४ ऑगस्ट रोजी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

संगमनेर बायपास पुणे नाशिक हायवेवर चाकण येथे जाण्यासाठी ७ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास एक प्रवासी महिला एका पिक अप मध्ये बसून जात होती. रात्री ९ ते १२ वाजेच्या दरम्यान नारायणगाव भाजी मार्केट परिसरात अनोळखी पिक अप चालकाने प्रवासी महिलेचा विनयभंग केला. तिला मारहाण करून दारू पाजून तिच्यावर अत्याचार करण्यात केला. नंतर तिला आळे फाटा येथे सोडून देऊन निघून गेला. आरोपीस नारायणगाव येथून ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. सदर गुन्हा त्याने कबुल केला आहे.

Web Title: Sangamner traveling woman was tortured by drinking alcohol  

See Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here