Home संगमनेर Coronavirus: संगमनेर तालुक्यात ३० करोनाबाधितांची वाढ

Coronavirus: संगमनेर तालुक्यात ३० करोनाबाधितांची वाढ

Coronavirus Sangamner taluka 30 infected increased

Coronavirus | संगमनेर: संगमनेर तालुक्यात रविवारी सायंकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार ३० करोनाबाधितांची वाढ झाली आहे. त्यामुळे रविवारी तालुक्यातील एकूण करोनाबाधितांची संख्या १,२१२ इतकी झाली आहे. 

रविवारी प्राप्त झालेल्या अहवालानुसार रंगारगल्ली येथे ६२ वर्षीय व्यक्ती, ३० वर्षीय महिला, मोमीनपुरा येथे ४४ व ७६ वर्षीय महिला, कुंभारवाडा येथे १२ वर्षीय मुलगा, गणेशनगर येथील ८० वर्षीय महिला, ४५ वर्षीय व्यक्ती, देवाचा मळा ३९ वर्षीय व्यक्ती यांना करोनाची बाधा झाली आहे. 

तसेच तालुक्यातील तिगाव येथे १७ व १० वर्षीय मुली, १३ वर्षीय मुलगा, चिंचोली गुरव येथे ६७,४२,३८ वर्षीय पुरुष, पिंपरी लौकी येथे ३ वर्षीय बालिका, ६० वर्षीय महिला, १७ व १८ वर्षीय तरुणांना करोनाची लागण झाली आहे. चंदनापुरी येथे ६९ वर्षीय व ५५ वर्षीय पुरुष, हिवरगाव पावसा येथे ८० वर्षीय वृद्ध, कनोली येथे ४९ वर्षीय महिला, गुंजाळवाडी येथे ७० वर्षीय पुरुष, जवळे कडलग येथे १९ वर्षीय तरुणी, घुलेवाडी येथे ४० व २७ वर्षीय पुरुष असे ३० करोनाबाधित आढळून आले आहेत. सध्या तालुक्यात १८८ जणांवर उपचार सुरु आहेत. 

Website Title: Coronavirus Sangamner taluka 30 infected increased

See Latest Marathi News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here