Home संगमनेर संगमनेर: युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या

संगमनेर: युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या

Sangamner News:  बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या (Suicide) केल्याची घटना.

Sangamner youth committed suicide by hanging himself with a rope

संगमनेर : तालुक्यातील साकूर जवळील बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील एका शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये १६ वर्षीय अल्पवयीन युवकाने दोरीच्या सहाय्याने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवार दि. ७ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली आहे.

दिपक गोरख केदार ( वय १६ ) रा. बोंबलदरा, चिकलठाण राहुरी फॅक्टरी ता. राहुरी असे मयत युवकाचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,  राहूरी तालुक्यातील बोंबलदरा, चिकलठाण राहुरी फॅक्टरी या ठिकाणाहून साकूर परिसरात उदरनिर्वाहासाठी गोरख अंजाबापू केदार यांचे कुटुंब आले होते. त्यांच्या समवेत पत्नी अलका केदार, मुलगा संदिप गोरख केदार त्याची पत्नी चित्रा संदिप केदार व मुलगा दिपक गोरख केदार हे बिरेवाडी शिवारातील बोकड्याच्या डोंगराजवळील वैभव दत्तात्रय सागर यांच्या गट नंबर ६३ या शेतातील पत्र्याच्या शेडमध्ये राहत होते. मंगळवार दि. ७ मार्च रोजी सकाळी गोरख केदार, अलका केदार, संदिप केदार, चित्रा केदार हे चौघेजण बाहेर कामाला गेले होते. दिपक केदार हा एकटाच घरी होता. वडील घरी आल्यावर दिपक गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला.

सदर घटनेची माहिती घारगाव पोलिसांना मिळताच पोलिस निरीक्षक संतोष खेडकर, पो कॉ बिरे, पो कॉ. चव्हाण, पो कॉ बांडे यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह खाली उतरवत शवविच्छेदनासाठी कुटीर रूग्णालयात पाठविण्यात आला आहे. दिपक लहानपणापासूनच मुकबधीर असल्याचे त्याच्या कुटुंबीयांनी सांगितले. मात्र नेमकी आत्महत्या का केली हे कारण अद्याप अस्पष्ट आहे.

Web Title: Sangamner youth committed suicide by hanging himself with a rope

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here