Home अहमदनगर ब्रेकिंग: अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी यांची निवड

ब्रेकिंग: अहमदनगर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी यांची निवड

Ahmednagar District Central Cooperative Bank president Shivaji Kardile: बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली.

Ahmednagar District Central Cooperative Bank president Shivaji Kardile

अहमदनगर: जिल्ह्याच्या ग्रामीण भागाची कामधेनू मानल्या जाणार्‍या नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा  नवा अध्यक्ष कोण होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. दरम्यान बँकेच्या अध्यक्षपदासाठी माजी आमदार शिवाजी कर्डिले यांची निवड झाली आहे.

दरम्यान बँकेच्या निवडणुकीनंतर अध्यक्षपद राष्ट्रवादीला व उपाध्यक्षपद काँग्रेसला (Congress) दिले गेले. त्यावेळी महानगर बँकेचे अध्यक्ष व युवा नेते अ‍ॅड. उदय शेळके यांना अध्यक्षपद देण्यात आले होते. पण दुर्दैवाने काही दिवसांपूर्वी प्रदीर्घ आजाराने त्यांचे निधन झाल्याने अध्यक्षपद रिक्त झाले होते. या रिक्त जागेसाठी आज निवडीसाठी संचालक मंडळाची विशेष सभा बोलावण्यात आली होती.

या संचालक मंडळात महाविकास आघाडीचे बहुमत असूनही महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी बाजी पलटवत माजी मंत्री शिवाजी कर्डिले  यांना पुन्हा एकदा अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेचे अध्यक्षपद मिळवून दिले आहे. कर्डिले यांनी माजी आमदार चंद्रशेखर घुले यांचा एक मताने पराभव केला.

Web Title: Ahmednagar District Central Cooperative Bank president Shivaji Kardile

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here