Home संगमनेर संगमनेर: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

संगमनेर: शेततळ्यात बुडून तरुणाचा मृत्यू

Breaking News | Sangamner: तरुण शेततळ्यातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेला असता शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू (Dies) झाल्याची घटना.

Sangamner Youth dies after drowning in farm

संगमनेर :  संगमनेर तालुक्यातील मिर्झापूर गावात महाविद्यालय शिक्षण घेणारा तरुण शेततळ्यातील पाण्याची पातळी पाहण्यासाठी गेला असता शेततळ्याच्या कागदावरून पाय घसरल्याने पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.  मंगळवारी सायंकाळी साडे पाच वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, तालुक्यातील मिर्झापूर येथील वसंत वलवे यांचा मुलगा स्वरूप मंगळवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास घरापासून जवळच असलेल्या शेततळ्यातील पाणी पातळी पाहण्यासाठी गेला होता. त्याचवेळी त्याचा कागदावरून पाय घसरून पाण्यात पडून दुर्दैवी मृत्यू झाला. स्वरूप वलवे या तरुणाच्या मृत्यूने मिर्झापूर गावावर शोककळा पसरली आहे.

या घटनेची माहिती समजताच त्याच्या नातेवाइकांनी शेततळ्याकडे धाव घेतली. मात्र, तोपर्यंत त्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. या प्रकरणी कैलास भागुजी वलवे यांनी दिलेल्या खबरीवरून तालुका पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. अधिक तपास पोलिस निरीक्षक देविदास दुमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक राजेंद्र लांघे करत आहे.

Web Title: Sangamner Youth dies after drowning in farm

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here