Home अहमदनगर प्रेमाच्या जाळ्यात ओढून घटस्फोट घेण्यास भाग पाडले, अत्याचार केला अन…

प्रेमाच्या जाळ्यात ओढून घटस्फोट घेण्यास भाग पाडले, अत्याचार केला अन…

Breaking Ahmednagar News : महिलेवर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (abused)

Forced to get divorced by being dragged into the net of love,and abused

अहमदनगर: अहमदनगरमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. घटस्फोट घेतलेल्या महिलेवर तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार (abused) केला आहे.

धक्कादायक म्हणजे तिच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी घेतलेल्या पाच लाख रुपयांची परस्पर विल्हेवाट लावलीय हे. म्हणजेच तिची लाखो रुपयांची फसवणूकच केली आहे. पीडितेने दिलेल्या तक्रारीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात तरुणाविरोधात अत्याचार, फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. करण विजय शेलार (रा. मोहिनीनगर, केडगाव) असे आरोपीचे नाव आहे.

फिर्यादीचा १८ मे २०२३ रोजी पतीसोबत घटस्फोट झाला असून त्यांना एक मुलगा व एक मुलगी आहे. फिर्यादी यांची २०१८ मध्ये करण शेलार सोबत ओळख झाली होती. त्यांच्यात प्रेमसंबंध झाल्याने करण याने फिर्यादीकडे लग्न करण्याची इच्छा व्यक्त केली.

फिर्यादी यांनी करण याच्यावर विश्वास ठेऊन लग्न करण्यास तयारी दाखवली. दरम्यान करण याने फिर्यादीकडे पहिल्या पतीपासून घटस्फोट घेतल्यानंतर लग्न करू, असे म्हटल्याने फिर्यादी यांनी त्यांच्या पतीपासून घटस्फोट घेतला. घटस्फोटानंतर फिर्यादीला पतीकडून रोख स्वरूपात पाच लाख रुपये मिळाले होते.

ते करण याने फिर्यादीच्या मुलांच्या नावावर एफडी करण्यासाठी मागितले. फिर्यादीने त्याच्यावर विश्वास ठेऊन त्याला पाच लाख रुपये दिले. त्याने त्या पाच लाखांची परस्पर विल्हेवाट लावून दुसऱ्या मुलीसोबत लग्न करून फिर्यादीची फसवणूक केली असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहा. पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे पुढील तपास करीत आहेत.

Web Title: Forced to get divorced by being dragged into the net of love,and abused

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here