Home अहमदनगर प्रियकराचे प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य,  प्रियकर पसार

प्रियकराचे प्रेयसीसोबत धक्कादायक कृत्य,  प्रियकर पसार

Breaking News | Ahmednagar Crime: प्रियेसीने ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी व कागदपत्रे असा ७८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन प्रियकर त्याच्या मित्रासह पसार झाल्याची घटना.

Shocking act of boyfriend with girlfriend, Priyakar Pasar

अहमदनगर: प्रियेसीने ठेवलेले सोन्याचे दागिने, रोकड, दुचाकी व कागदपत्रे असा ७८ हजार रूपयांचा ऐवज घेऊन प्रियकर त्याच्या मित्रासह पसार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी कल्याण रस्त्यावर राहणाऱ्या पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकर व त्याच्या मित्राविरोधात कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रियकर शुभम ज्ञानदेव काळे (रा. कौठा, चांदा, ता. नेवासा) व त्याचा मित्र शंकर शिरसाठ (रा. पिंपळगाव टप्पा ता. पाथर्डी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. फिर्यादीचा विवाह झाला असून त्यांचे पती सोबत वाद झाल्याने त्या एकट्याच राहत होत्या.

सुमारे चार वर्षापूर्वी त्यांची शुभम काळे सोबत त्यांची ओळख झाली. त्यांच्यात मैत्री होऊन पुढे प्रेम संबंध जुळले. ते दोघे सुमारे चार वर्षापासून एकत्र राहत होते. दरम्यान रविवारी (दि. त्यांच्या गुरू देवदर्शनासाठी १४) फिर्यादी बहिणीसोबत तुळजापूर येथे गेल्या होत्या. त्यावेळी शुभम काळे हा त्यांच्या घरी होता. फिर्यादी सोमवारी (दि. १५) पहाटे दीड वाजता घरी आल्या असता त्यांना घर बंद दिसले. फिर्यादी यांनी घराचा दरवाजा उघडून घरात गेल्या असता त्यांना घरात ठेवलेले मंगळसूत्र, कानातील वेल झुमके, रोकड तसेच दुचाकी व तिचे कागदपत्रे दिसून आले नाही. त्यांनी शेजारी राहणाऱ्या मैत्रिणीकडे चौकशी केली असता शुभम व त्याचा मित्र शंकर हे दोघे घरात असल्याची माहिती मिळाली.

फिर्यादी यांनी दोघांना फोन केला असता त्यांनी फोन घेतला नाही. त्यांनतर फिर्यादी यांनी मंगळवारी (दि. १६) कोतवाली पोलीस ठाणे गाठून घडलेला प्रकार सांगितला दिलेल्या फिर्यादीवरून प्रियकर व त्याचा मित्र शुभम काळे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत.

Web Title: Shocking act of boyfriend with girlfriend, Priyakar Pasar

See also: Latest Marathi NewsBreaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here