Home पुणे बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे निधन

बाळासाहेब ठाकरे यांच्या बहिणीचे निधन

Sanjeevani Karandikar Passes Away

पुणे | Sanjeevani Karandikar Passes Away: थोर समाजसुधारक प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या आणि शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांची बहिण संजीवनी करंदीकर यांचं पुण्यात वृद्धापकाळाने निधन झाले आहे. त्या ८४ वर्षांच्या होत्या. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ते आत्या होते. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. तर चित्रपट सेनेच्या पदाधिकारी कीर्ती फाटक यांच्या त्या मातोश्री होते.

मुख्यमंत्री ठाकरे शोक संदेशात म्हणाले की, संजीवनी करंदीकर या आमच्या आत्या होत्याच, पण प्रबोधनकार ठाकरे यांच्या कन्या व शिवसेनाप्रमुखांच्या भगिनी होत्या. त्यांना एक समृद्ध वारसा लाभला व त्यांनी तो शेवटपर्यंत जपला. त्यांच्या जाण्याने शेवटचा दुवाही निखळला. संजूआत्या म्हणून त्या ठाकरे कुटुंबात प्रख्यात होत्या. वाचनाचा छंदही अफाट होता. प्रबोधनकारांच्या अनेक गोष्टी त्या आम्हाला सांगत. सगळ्यात छोटी बहीण म्हणून शिवसेनाप्रमुखांचा संजू आत्यावर विशेष लोभ होता व संजू आत्याही आम्हा सगळ्यांना तेवढ्याच मायेने वागवत आल्या. त्यांच्या जाण्याने ठाकरे कुटुंबाने मायेचे छत्र गमावले.

Web Title: Sanjeevani Karandikar Passes Away

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here