महिला पुरुष सकाळी फिरताना तरुणाचा आढळला मृतदेह अन …
Ahmednagar | Shrigonda | श्रीगोंदा: श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील दीपक विनायक कापडे वय ३५ या व्यावसायिक तरुणाने जीवनाला कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची घटना समोर आली आहे.
नगर दौंड रोडवर जयश्री मंगल कार्यालयासमोर दीपक कापडे यांचे जय मल्हार चहा नाश्त्याचे हॉटेल व वाशिंग सेंटर आहे. दररोज नेहमीप्रमाणे काम करून झाल्यावर ११ रोजी मध्यरात्री आपल्याच व्यवसायाच्या ठिकाणी छताला गळफास लावून आत्महत्या केली सकाळी रस्त्यावर गावातील अनेक महिला पुरुष व्यायाम करण्यासाठी रस्त्यावरून जात असताना लटकलेल्या अवस्थेत त्याचा मृतदेह दिसून आला. या घटनेची माहिती श्रीगोंदे पोलीस ठाण्यात देऊन पोलिसांनी पंचनामा केला. ग्रामीण रुग्णालयात शवविचेदन करून दुपारी त्यांच्यावर घोडनदीकाठी अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरु आहे.
Web Title: Suicide Case body of the youth was found while the men and women were walking