Home अकोले राजूर: सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व...

राजूर: सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

राजूर: सर्वोदय विद्या मंदिर कनिष्ठ महाविद्यालयात इ. १२वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न

राजूर: अकोले तालुक्यातील राजूर येथील गु. रा. वि. पाटणकर सर्वोदय विद्या मंदिर माध्य. व उच्च माध्यमिक विद्यालयात इ. १२वी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा व निरोप समारंभ कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमप्रसंगी सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख, सत्यानिकेतन संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य टी. एन. कानवडे, विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे, सत्यानिकेतन संस्था संचालक श्री. विजय पवार, उपप्राचार्य श्री. पर्बत एल. पी.,पत्रकार प्रकाश महाले आदीसह विद्यार्थी, सर्व शिक्षक व शिक्षेकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्यानिकेतन संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहर देशमुख हे होते. यावेळी विद्यालयाकडून अॅड. मनोहर देशमुख व सत्यानिकेतन संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य टी. एन. कानवडे यांचा सत्कार करण्यात आला.  अॅड. मनोहर देशमुख यांनी २०१८ -१९ या वर्षाच्या इ. १२ वी. च्या विद्यार्थ्यांना परीक्षा, अभ्यास व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आपल्या मायभूमीला विसरू नका असे संबोधण्यात आले.

तसेच आज विद्यालयात हुतात्मा दिन साजरा करण्यात आला. याचे औचित्य साधून सत्यानिकेतन संस्थेचे सचिव तथा माजी प्राचार्य टी. एन. कानवडे यांनी सर्व विद्यार्त्यांनी स्वच्छता हा गुण अंगिकारला पाहिजे असे आवाहन करण्यात आले तसेच २०१८ -१९ या वर्षाच्या इ. १२ वी. च्या विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या व विद्यालयाचे नाव लौकिक करण्यास जास्तीत जास्त अभ्यास करण्याचे आवाहन केले. विद्यालयाचे प्राचार्य श्री. एम.डी. लेंडे यांनी विद्यालयाचे नाव उज्वल करण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले तसेच भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमप्रसंगी विद्यार्त्यानी आपल्या भाषणातून सत्यानिकेतन संस्था, विद्यालय व शिक्षकांबद्दल प्रेम, आदर व आपुलकी व्यक्त करण्यात आली. या विद्यालयातून निरोप घेण्याचे असल्यामुळे विद्यार्त्यांनी हळहळ व्यक्त केली. विद्यालयाचे उप प्राचार्य श्री. पर्बत एल.पी. यांनी विद्यालयासोबतचे मित्रत्वाचे नाते व प्रेम असेच टिकवून ठेवावे असे आपल्या प्रास्ताविकातून संबोधण्यात आले. सर्व शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परीक्षा व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

या कार्यक्रमाचे आयोजन श्री. संतराम बारवकर यांनी केले, तसेच सूत्रसंचालन श्रीमती. भालेराव एस. व्ही. यांनी केले व  कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. ताजने बी.एन. यांनी केले. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन श्री. शेंडगे रमेश तर कार्यक्रम छायाचित्रण श्री. गुंजाळ अजित यांनी केले. हा कार्यक्रम पार पाडण्यासाठी सर्व शिक्षकांचे मोलाचे सहकार्य लाभले.  

पहा बातमीत- गावातीलच तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Website Title:  sarvoday Vidya Mandir school Rajur Greetings 


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक करा



प्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here