Home अकोले अकोले: कळसचे सुपुत्र मयूर वाकचौरे यांना राष्ट्रपती ‘सेना पदक’ जाहीर

अकोले: कळसचे सुपुत्र मयूर वाकचौरे यांना राष्ट्रपती ‘सेना पदक’ जाहीर

अकोले: कळसचे सुपुत्र मयूर वाकचौरे यांना राष्ट्रपती ‘सेना पदक’ जाहीर

अकोले: अकोले तालुक्यातील कळस गावाचे सुपुत्र मयूर वाकचौरे यांना सैन्यदलात मानाचे समजले जाणारे राष्ट्रपती सेना पदक जाहीर झाले आहे.

प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने सैन्य दलातील उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या सैनिकांना विविध पदक देऊन गौरविण्यात येते. भारताचे राष्ट्रपती श्री. रामनाथ गोविंद यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतात. मयूर वाकचौरे हे मराठा लाईट इंफ्रट्री रेजिमेंट मध्ये कार्यरत आहे. ४१ राष्ट्रीय रायफल मराठा लाईट  इंफ्रट्री रेजिमेंट कुपवाडा सेक्टरला बदली असताना १८ मार्चला १२ वाजता संदेश मिळाला कि, पाच सहा अतिरेकी कुपवाडाच्या जंगलात घुसले आहे अन त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. अतिरेकी अन जवानांची चकमक झाली. त्यामध्ये मयुरने दोन अतिरेक्यांना कंठस्नान घातले. मात्र या चकमकीत पाच जवान शहीद झाले. सर्व अतिरेक्यांचा बंदोबस्त केला. मोहीम फत्ते झाली.  राष्ट्रीय रायफल मराठा लाईट  इंफ्रट्री च्या अधिकार्यांनी मयूर वाकचौरे यांची सेना पदकासाठी शिफारस केली त्यामुळे राष्ट्रपतीनी मयूर वाकचौरे यांना सेना पदक जाहीर केले.

प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हे पदक प्रदान केले जाते. परंतु मयूर हा जम्मू काश्मीरच्या दुर्गम भागात राहत असल्याने ते नंतर प्रदान केले जाईल. मयूर वाकचौरे हा कळस बुद्रुक येथील असून २२ डिसेंबर २०१४ रोजी सैन्यदलात भरती झाला आहे. राष्ट्रपती सेना पदक जाहीर झाल्यानंतर मयूर वाकचौरे यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

पहा बातमीत- गावातीलच तरुणाने केला अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Website Title:  kalas declares Mayur Wakchaure as Sena Medal


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here