Home अकोले अकोले: जिल्हास्तरिय गणित- विज्ञान प्रदर्षणात सर्वोदय विदया मंदिर खिरविरेचे सुयश

अकोले: जिल्हास्तरिय गणित- विज्ञान प्रदर्षणात सर्वोदय विदया मंदिर खिरविरेचे सुयश

जिल्हास्तरिय गणित- विज्ञान प्रदर्षणात सर्वोदय विदया मंदिर खिरविरेचे सुयश.

प्राथमिक स्तरावर कु. ऋतुजा डगळेचा प्रथम क्रमांक.

पिंपळगाव नाकविंदा/ प्रतिनिधी – विदयार्थ्यांनी केलेले प्रयोग उदयाच्या मानव कल्याणासाठी फायदेशिर ठरणारे आहेत. मुले हि बीज प्रमाणे असल्याने त्यांना आता शिकविण्यापेक्षा रुजविण्याची गरज आहे. शिक्षकाच्या कार्याची उंची हि शिष्याच्या गुणवत्तेवरून ठरत असते. त्यासाठी विदयार्थ्यांमध्ये आत्मविश्वास असावा लागतो. आपण जे आत्मविश्वासाने करू तेच घडत असते. हाच वैज्ञानिक दृष्टीकोन समोर ठेऊन अकोले तालुक्यातील सर्वोदय विद्या मंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खिरविरे येथील कु. ऋतुजा सुनिल डगळे हिने जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक मिळवून ग्रामीण भागाचे नाव रोषण केले.
प्रवरा पब्लिक स्कुल लोणी येथे अहमदनगर जिल्हा परिषद शिक्षण विभाग व जिल्हा विज्ञान- गणित अध्यापक संघ आणि प्रवरा ग्रामीण शिक्षण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजीत जिल्हा स्तरीय विज्ञान- गणित, पर्यावरण व लोकसंख्या शिक्षण प्रदर्शन व ग्रंथ मोहत्सव नुकतेच संपन्न झाले. या प्रदर्शनात गणित विभागामध्ये प्राथमिक स्तरातील बहुउद्देशीय गणिती उपकरणास कु. ऋतुजा सुनिल डगळे हिने प्रथम क्रमांक मिळविला.
याप्रसंगी विरोधी पक्ष नेते ना. राधाकृष्ण विखे, अटल लॅबचे मार्गदर्शक आणि भारत सरकारच्या निती आयोगाचे संदिप खुपेकर, उपसभापती बाबासाहेब म्हस्के, गटशिक्षण अधिकारी मीना शिवगुंडे, उपशिक्षण अधिकारी रामदास खेडकर, राजेश परजणे, भारत घोगरे, डॉ. अशोक कोल्हे, प्रा.दिगंबर खर्डे, प्राचार्य सयराम शेळके यांसह जिल्हयातील बहुसंख्य शाळांचे शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते रोख एक हजार एक रुपये, पारितोषिक, प्रशस्तीपत्र तसेच स्मृतीचिन्ह असे बक्षीस देण्यात आले. सदर उपकरणाची राज्यस्तराव निवड झाली.
या यशस्वी विद्यार्थीनीस गणित शिक्षिका कविता वाळुंज यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.
या घवघवीत यशाबद्दल विदयार्थीनी कु. ऋतुजा डगळे तसेच मार्गदर्शक शिक्षीका कविता वाळुंज यांचे सत्यनिकेतन राजुर संस्थेचे अध्यक्ष अॅड. मनोहरराव देशमुख, सचिव टि.एन. कानवडे, सहसचिव मिलिंद उमराणी, विश्वस्त प्रकाश शहा, माजी प्राचार्य तथा संचालक प्रकाश टाकळकर, सर्व संचालक मंडळ, विदयालयाचे प्राचार्य अंतुराम सावंत तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदिंनी अभिनंदन केले. व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Website Title:  Sarvodaya Vidya Mandir Khirvire in science exhibition Prize


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here