Home महाराष्ट्र महिला बँक मॅनेजरला गंडा घालणाऱ्या फेसबुक मित्राला अटक

महिला बँक मॅनेजरला गंडा घालणाऱ्या फेसबुक मित्राला अटक

महिला बँक मॅनेजरला गंडा घालणाऱ्या फेसबुक मित्राला अटक

मुंबई: विदेशातून पाठविलेल्या लाखो रुपये किमतीच्या उपहारासाठी विविध कर भरण्यास सांगून फेसबुक मित्राने बँक मॅनेजर तरुणीला ३ लाख ७५ हजारांचा गंडा घातल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. यातील भामट्याला पवई पोलिसांनी दिल्ली येथून अटक केली आहे. बंटी सत्येंद्र प्रताप सोवरण सिंह असे अटक आरोपीचे नाव असून त्याची महिला साथीदार फरारी असल्याचे पोलिसांनी सांगितले.

फेसबुकसारख्या सोशियल मिडीयाचा वापर करताना तरुणी भान ठेवत नसल्याचे बँक मॅनेजर तरुणीच्या फसवणुकीवरून पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. यातील फिर्यादी तरुणी हि वांद्रे माउंटमेरी रोड येथे राहते. ती चांदवली येथील एका नामांकित बँकेत सहायक मॅनेजर म्हणून कार्यरत असून तरुणीच्या फेसबुक अकौंटवर ऑक्टोबर २०१८ मध्ये आरोपी सत्येंद्र सिंहने फ्रेंड रीक्वेस्ट पाठवली. त्याचे प्रोफिले पाहून फिर्यादीने ती रीक्वेस्ट स्वीकारली. अनेक दिवस फिर्यादी आणि आरोपी दोघे फेसबुक च्या माध्यामातून एकमेकांच्या संपर्कात होते. त्यानंतर तो इटली देशाचा नागरिक आहे. सध्या तो लंडन येथील मरीन इंजिनियर कंपनीत कामाला असल्याचे सांगून या तरुणीचा विश्वास संपादन केला व तिला थाप मारली की, त्याचे जहाज फिनलंड देशात असून आम्ही खरेदीसाठी जाणार आहोत. तुझ्यासाठी महागड्या वस्तू खरेदी करणार आहोत त्या वस्तू तुला काही दिवसांत मिळतील.

काही दिवसानंतर सतेंद्र सिंहच्या महिला साथीदाराने दिल्लीतील कस्टम अधिकारी नेहा माथुर असल्याचे  भासवून फिर्यादीला फोन केला कि तुमच्या नावाने विदेशातून महागड्या वस्तू, सोन्याचे दागिने, घड्याळ अशा वस्तूंसह विदेशी चलन आले आहे. तुम्हाला कर भरावा लागेल अशी बतावणी करून विविध बँकेत टॅक्सची रक्कम भरण्यास सांगितले. फिर्यादीने सुरुवातीला ५१ हजार रुपये त्यानंतर एका आठवड्यात विविध बँकेत ३ लाख ७१ हजार रुपयांची रक्कम भरली. मात्र तिला पार्सल मिळाले नाही. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानतर फिर्यादीने या प्रकरणी पवई पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.  

पहा बातमीत – परप्रांतीय सहा दरोडेखोरांची टोळी जेरबंद

Website Title:  Facebook friend who sticks to the woman bank manager is arrested


संगमनेर न्यूज | Sangamner News | वेबसाईटला भेट देण्यासाठी येथे क्लिक करा. संगमनेर अकोले बातम्यांच्या अपडेटसाठी आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. Facebook Page. 


आपण आपल्या बिझनेस, व्यवसाय, न्यूज, संस्था यांची वेबसाइट बनवू शकता. फक्त 2499/- रु. मध्ये 1 वर्षाकरिता आजच संपर्क करा. 9850540436. त्यासाठी येथे क्लिक कराप्रमोटेड बातम्या:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here