Home संगमनेर संगमनेर: सत्तूर बाळगणारा तरुण जेरबंद

संगमनेर: सत्तूर बाळगणारा तरुण जेरबंद

Breaking News | Sangamner Crime: कमरेला सत्तूर लावून फिरणाऱ्या २१ वर्षीय युवकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Sattur carrying youth Arrested

संगमनेर: कमरेला सत्तूर लावून फिरणाऱ्या २१ वर्षीय युवकाविरोधात संगमनेर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ही कारवाई रविवारी (दि.१६) दुपारी १.३५ वाजेच्या सुमारास शहरातील प्रवरा, म्हाळुंगी नदीच्या संगमावरील घाटाजवळ करण्यात आली.

अमन आरिफ पठाण (वय २१, रा. अँग्लो उर्दू स्कूलसमोर, नाईकवाडपुरा, संगमनेर) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. त्याच्याविरोधात पोलिस कॉन्स्टेबल विजय तबाजी आगलावे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. संगमावरील घटाजवळ एक अनोळखी युवक कमरेला हत्यार लावून फिरत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती, पोलिस पथक संगमावरील घाटाजवळ पोहोचले. पोलिसांनी तेथे एका अनोळखी युवकाची झडती घेतली असता त्याच्या कमरेला सत्तूर लावलेला आढळून आला. त्याला ताब्यात घेत पोलिस ठाण्यात आणत त्याच्याविरोधात भारतीय हत्यार कायदा कलम ४/२५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास शहर पोलीस करत आहेत. दरम्यान नदी परिसरात हत्यारबंद वाळू तस्कर रात्री अपरात्री, पहाटे फिरत असतात. तसेच या परिसरात गंजाडी, नशेखोर, जुगारी आणि टवाळखोरांचा नेहमीच राबता असतो. त्यामुळे नदीकाठी फिरण्यास येणाच्या, देवदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना देखील त्याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. आवर्तन काळात देखील टवाळखोरांमुळे महिलांना त्रास होतो. याकडे शहर पोलीस प्रशासनाने लक्ष द्यावे अशी मागणी होत आहे.

Web Title: Sattur carrying youth Arrested

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here