संतापजनक! स्कूल बसचालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार
Nagpur Crime: अल्पवयीन मुलीला तिचा हात कापण्याची धमकी देऊन अत्याचार (abused) केल्याची संतापजनक घटना उघडकीस.
नागपूर: एका स्कूल बसचालकाने १३ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिचा हात कापण्याची धमकी देऊन अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी स्कूल बसचालकाला अटक केली आहे. ही घटना ३१ ऑगस्टच्या संध्याकाळी ६ ते ८ वाजण्याच्या सुमारास हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.
नितेश गजभिये (२५, रा. हुडकेश्वर, नागपूर) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा खासगी स्कूल बसने शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करतो. पीडितेची एक मैत्रीणही आरोपीच्या स्कूल बसमधून प्रवास करते. त्यामुळे पीडितेची आरोपीशी ओळख झाली. ३१ ऑगस्टच्या रात्री
आरोपीला पीडिता सायकलवर जाताना दिसली. त्याने तिला थांबवून हात कापण्याची धमकी देत निर्जनस्थळी नेऊन तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तो मुलीला सोडून पळून गेला. पीडितेने घरी आल्यानंतर पालकांना तिच्यासोबत घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर कुटुंबीयांच्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली आहे.
Web Title: school bus driver abused a minor girl
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App