एका सुप्रसिद्ध बिल्डरचे राहत्या घरातून अपहरण, एकच खळबळ
Nashik Crime: चार चाकी गाडीचा वापर करीत अज्ञात इसमांनी सुप्रसिद्ध बिल्डरचे अपहरण (Kidnapping) केल्याची घटना.
नाशिक: नाशिकचे सुप्रसिद्ध नामवंत बांधकाम व्यवसायिक हेमंत पारख यांचे राहत्या घरापासून अपहरण झाल्याची घटना शनिवारी रात्री साडे दहा वाजेच्या सुमारास घडली. हेमंत पारख गजरा ग्रुपचे चेअरमन आहेत. नाशिकमधील प्रतिष्ठीत व्यक्ती आणि सुप्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक म्हणून त्यांची ख्याती आहे. मात्र, त्यांचंच अपहरण झाल्याने नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शनिवारी रात्री 9 वाजून 40 मिनिटांनी अज्ञात इसम पारख यांच्या घरासमोर आले. हे गुंड चारचाकी आणि दुचाकीवरून आले होते. आल्या आल्या त्यांनी हेमंत पारख यांना चारचाकीत कोंबले आणि सुसाट वेगाने पळून गेल्याचे सांगितलं जात आहे. पारख यांचं अपहरण झाल्याचं कळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.
पारख यांचं अपहरण झाल्याची बातमी नाशिकमध्ये वाऱ्यासारखी पसरली. त्यामुळे नाशिककर चांगलेच हादरून गेले आहेत. गुंड घरासमोर येऊन अपहरण करत असल्याने नाशिककरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तर आपल्या घरासमोरूनच घरच्या व्यक्तीचं अपहरण झाल्याचं ऐकून पारख कुटुंबालाही धक्का बसला आहे.
पारख यांचा अजूनही तपास लागलेला नाही. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन चौकशी केली. अनेकांची साक्ष घेतली. सीसीटीव्हीही तपासून पाहण्याचं काम सुरू आहे. शहरात अनेक ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. मात्र, रात्र उलटून गेली तरी पारख यांचा शोध न लागल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. या घटनेने संपूर्ण नाशिकमध्ये खळबळ उडाली आहे.
Web Title: Nashik Kidnapping of a well-known builder from his residence
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App